April 7, 2025 8:33 PM April 7, 2025 8:33 PM

views 8

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांची अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज  अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा केली आणि भारत- प्रशांत क्षेत्र, भारतीय उपखंड, युरोप, पश्चिम आशिया आणि कॅरेबियन याविषयीच्या परिप्रक्ष्यावर मतांची देवाणघेवाण केली. द्वीपक्षीय व्यापार कराराच्या महत्त्वावर दोघांचं एकमत झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

February 15, 2025 7:28 PM February 15, 2025 7:28 PM

views 6

भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ-जयशंकर

लोकशाहीला पश्चिमी देशांचं वैशिष्ट्य मानत असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टिका केली आहे. ते काल म्युनिच सुरक्षा परिषदेत एका परिसंवादात बोलत होते. स्वतःच्या देशात लोकशाही तत्वांवर निष्ठा ठेवताना ग्लोबल साऊथ मध्ये मात्र पाश्चिमात्य देश बिगर लोकशाही विचारांना समर्थन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ राहिल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. 

September 26, 2024 2:23 PM September 26, 2024 2:23 PM

views 8

न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी घेतला भाग

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक तीन प्रमुख क्षेत्रांवर त्यांनी भारताचे विचार मांडले. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक नेत्यांनी विकास वाढीचा आणि हवामानासाठी आर्थिक व्यवस्थेचा विस्तार करण्याचं आवाहन जयशंकर यांनी यावेळी केलं.