October 13, 2024 8:09 PM

views 23

विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून गुंतवणूक काढली

इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात ५८ हजार ७११ कोटी रुपयांच्या  समभागातून गुंतवणूक काढून घेतली. चीनमधल्या भांडवली बाजारांमधे चांगलं वातावरण राहिल्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारांवर झाल्याचं दिसतं.    गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५७ हजार ७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक...

July 15, 2024 3:56 PM

views 33

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवली बाजारात परकीय संस्थांकडून २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय संस्थांनी भारतीय भांडवली बाजारात २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.गुंतवणूकदारांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी १५ हजार ३५२ कोटी रुपये समभाग विक्री आणि ८ हजार ४८४ कोटी रुपये कर्जाऊ बाजारात गुंतवले,ज्यामुळे १२ जुलैपर्यंत भारतीय भांडवली बाजारात निव्वळ गुंतवणूक २३ हजार ८३६ कोटी रुपये झाली,असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.