April 9, 2025 1:43 PM April 9, 2025 1:43 PM
8
सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या लंडनमध्ये आयोजित भारत-यूके गुंतवणूकदार गोलमेज चर्चासत्रात बोलत होत्या. नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत आर्थिक विकास आणि गुंतवणूकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुंतवणूक आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विविध परवानग्या घेण्याची औपचारिकत...