May 3, 2025 12:22 PM May 3, 2025 12:22 PM

views 11

देशाच्या परकीय चलन साठ्यात २ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६८८ अब्ज डॉलर्सवर: RBI

देशाच्या परकीय चलन साठ्यात २५ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात अंदाजे २ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो सुमारे ६८८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं प्रकाशित केलेल्या साप्ताहिक आकडेवारीत म्हटलंय की, गेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता, २ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढून सुमारे ५८० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. दरम्यान, विशेष कर्जपात्रता हक्क २कोटी १०लाख डॉलर्सनं वाढून १८ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मध्यवर्ती बँकेची पतही २० लाख डॉलर्सने वाढून साडेचार अब्ज डॉलर्सवर...

September 28, 2024 1:38 PM September 28, 2024 1:38 PM

views 9

देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी डॉलर्स वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून देशाच्या विशेष आहरण अधिकारातही १२ कोटी १० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो १८ अब्ज ५४ कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे.