November 12, 2025 3:27 PM November 12, 2025 3:27 PM

views 28

फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या तयारीत

पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २०२६मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपली कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथे एका परिषदेत सांगितलं. येत्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून उद्या आयर्लंडविरुद्ध पोर्तुगाल हा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास पोर्तुगालचा फिफा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.   जगभरात असंख्य चाहते अ...

September 6, 2025 3:14 PM September 6, 2025 3:14 PM

views 16

काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना ओमान संघाशी होणार

ताजिकिस्तान इथं सुरु असलेल्या काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या सोमवारी आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ओमानच्या संघाशी होणार आहे. उझबेकिस्तान आणि ओमान या दोन्ही संघांचे अ गटात समान गुण झाले असून हे दोन्ही संघ पहिल्या दोन स्थानांवर असून तिसरं स्थान गाठण्यासाठी भारताचा ओमानबरोबरच सामना निर्णायक ठरणार आहे.

August 13, 2025 8:18 PM August 13, 2025 8:18 PM

views 28

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ही नियुक्ती जाहीर केली असून खालिद जमाल यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल. जमील यांनी जमशेदपूर, नॉर्थ-ईस्ट युनायटेड, ईस्ट बंगाल, मोहन बगान आणि मुंबई अशा विविध फुटबॉल क्लब्समधे काम केलं आहे.

August 13, 2025 1:03 PM August 13, 2025 1:03 PM

views 13

64 वी सुब्रतो करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार

64 वी सुब्रतो करंडक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार. यामध्ये मुलं आणि मुली, ज्युनिअर आणि सबज्युनिअर अशा 3 श्रेणींमध्ये 106 संघ सहभागी होणार आहेत.   19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान दिल्ली एनसीआर आणि बंगळूरू मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये 4 परदेशी संघही सहभागी होणार आहेत. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.

May 19, 2025 12:18 PM May 19, 2025 12:18 PM

views 20

फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील कालच्या सामन्यात भारताला विजेतेपद

19 वर्षांखालील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं. अरुणाचल प्रदेशमधल्या युपिया इथं काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनल्टी शूट आउटमध्ये बांग्लादेशच्या संघावर 4-3 अशा गुणांनी मात केली.   भारतीय संघाचा कर्णधार शामी यानं सामन्यात दुसऱ्याच मिनिटांत बांग्लादेशविरुद्ध पहिला गोल केला. बांग्लादेशच्या संघानं शेवटच्या काही मिनिटांत गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र निर्णायक क्षणी शामीनं केलेल्या गोलमुळे भारताला विजय मिळवता आला.

March 2, 2025 5:14 PM March 2, 2025 5:14 PM

views 12

ISL Football: ईस्ट बेंगॉल आणि बंगळुरू यांच्यात सामना रंगणार

फुटबॉल इंडियन सुपर लीग स्पर्धेतला आजचा सामना, संध्याकाळी साडे सात वाजता, ईस्ट बेंगॉल आणि बंगळुरू यांच्यात कोलकात्यातल्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणार आहे. 

February 3, 2025 2:10 PM February 3, 2025 2:10 PM

views 10

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत फूटबॉलमध्ये हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीची आपापल्या गटात विजयी सलामी

फूटबॉलमधे हरियाणा, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीने आपापल्या गटात विजयी सलामी दिली आहे. गट अ मधे हरियाणाने तामिळनाडूला ७-० अशा मोठ्या फरकाने हरवलं. तर ओदिशाने सिक्कीमवर ५-१ अशी मात केली. गट ब मधे पश्चिम बंगालने यजमना उत्तराखंडला २-० नं हरवत स्पर्धेत आगेकूच केली आहे. या सामन्यात पश्चिम बंगालने सुरुवातीपासूनच उत्तराखंडवर वर्चस्व राखलं. गट ब मधल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघाने मणिपूरला २-१ ने नमवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.

January 14, 2025 3:30 PM January 14, 2025 3:30 PM

views 15

ISL Football : केरला ब्लास्टर क्लबचा ओदिशावर ३-२ असा विजय

फूटबॉलच्या इंडियन सुपर लीग मध्ये काल झालेल्या सामन्यात केरला ब्लास्टर फूटबॉल क्लबने ओदिशा फूटबॉल क्लबवर ३-२ असा विजय मिळवला. ब्लास्टरने शेवटच्या अर्ध्या तासात तीन गोल करत  बाजी मारली. जेरी मविहमिंगथांगाने ओदिशाला सुरुवातीला आघाडी मिळवून दिली होती.  साठाव्या मिनिटाला क्वामे पेपराहने गोल करत बरोबरी साधेपर्यंत ओदिशाने सामन्यावर पकड कायम ठेवली होती. जेसस जिमनेज याने ७३व्या मिनिटाला गोल करत केरळला आघाडी मिळवून दिली. पण, ८०व्या मिनिटाला ओदिशाने गोल करत बरोबरी साधली. शेवटच्या तीस मिनिटात तिसरा गोल करत ...

January 6, 2025 10:33 AM January 6, 2025 10:33 AM

views 21

फुटबॉल : केरळ ब्लास्टर्सचा पंजाब एफसी संघावर १-० असा विजय

दिल्लीत झालेल्या भारतीय फुटबॉल साखळी सामन्यात केरळ ब्लास्टर्सनं पंजाब एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्यावर पंजाबच्या संघाचं वर्चस्व राखले होते तरीही त्यांना त्याचं गोलमध्ये रुपांत करता आलं नाही. या विजयामुळे केरळ ब्लास्टर्स नवव्या स्थानी पोचला असून, पंजाब एफसी हा चौथा पराभव आहे. पंजाब 18 व्या स्थानावर आहे. आज संध्याकाळी कोलकाता इथं ईस्ट बंगाल एफसीचा मुकाबला मुंबई सिटी एफसीशी होणार आहे. साखळीत मुंबई सातव्या तर ईस्ट बंगाल 11 व्या स्थानी आहे. 12 मार्चला साखळी फेरीची सांगता होणार आहे.

January 1, 2025 9:38 AM January 1, 2025 9:38 AM

views 19

संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम बंगालला विजेतेपद

हैदराबादमध्ये झालेल्या संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पश्चिम बंगालनं काल आपलं 33 वं विजेतेपद पटकावलं. त्यांनी केरळवर 1 – 0 असा विजय मिळवला. बंगालच्या रॉबी हंसडा यानं शेवटच्या काही मिनिटांमध्ये मिळवलेल्या या गोलनं पश्चिम बंगालचा 7 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. हंसडा याच्या 12 गोल्सनं त्याला या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवून दिला.