May 29, 2025 5:57 PM May 29, 2025 5:57 PM

views 11

अन्नधान्य उत्पादन ३५ कोटी ४० लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज

सन २०२४-२५ मधे भारताचं अन्नधान्य उत्पादन ३५ कोटी ४० लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज सरकारने वर्तवला आहे. हे उत्पादन २०२३-२४ पेक्षा ६ टक्क्याहून जास्त आहे. गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, डाळी आणि शेंगदाणा या प्रमुख पिकांचा यात समावेश आहे. तांदूळ १ हजार ४९० लाख मेट्रिक टन, गहू १ हजार १५७ लाख मेट्रिक टन तसंच भरड धान्यामधे ५४ लाख मेट्रिक टनाची वाढ झाली आहे.   अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होत आहे, मात्र डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनाचा वेग वाढवण्याची गरज आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौह...