January 1, 2025 3:50 PM January 1, 2025 3:50 PM

views 8

भरड धान्य खरेदी अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या १५ जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या केंद्रामधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

September 26, 2024 11:41 AM September 26, 2024 11:41 AM

views 5

देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन

देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून ३३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत. सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकड...