December 29, 2025 1:45 PM December 29, 2025 1:45 PM
5
उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
उत्तर भारतात धुक्यामुळे विमानउड्डाणे तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीला येणाऱ्या अठरा रेल्वे गाड्या तीन तासांपेक्षा उशीराने धावत आहेत अशी माहिती रेल्वेच्या दिल्ली विभागानं दिली. धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरुन नियोजित ६४ हवाई उड्डाणे रद्द झाली. प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या अधिकृत संपर्क यंत्रणेवरुन अद्ययावत माहिती घेऊन प्रवास करावा अशी सूचना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे.