December 20, 2025 1:29 PM December 20, 2025 1:29 PM
4
विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमांचं पालन करण्याचे निर्देश
नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या धुक्यामुळे तसंच कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतुकीवर कमालीचा परिणाम होत आहे, त्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी उड्डाणांसंबधी प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. दीर्घ विलंबाच्या वेळी प्रवाशांना भोजन आणि अल्पोपहार देण्याचे तसंच विमान रद्द झाल्यास पुन्हा आरक्षण द्यावं किंवा तिकिटाच्या रक्कमेची परतफेड करावी, असंही मंत्रालयानं स्पष्ट ...