July 8, 2025 1:21 PM July 8, 2025 1:21 PM
7
‘ब्रिक्स’ समुह सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच – अर्थमंत्री निर्मला सितारामन
ब्रिक्स समूह हा सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल रियो दि जिनेरो इथं ब्रिक्स अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकांच्या गर्व्हरनरांच्या बैठकीला संबोधित करत होत्या. आंतरराष्ट्रीय संस्था वैधतेच्या आणि प्रतिनिधीत्वाच्या संकटात सापडलेले असताना आपापसातलं सहकार्य वृद्धींगत करुन विश्वासपूर्वक सुधारणांचं समर्थन करणं महत्त्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या. ग्लोबल साऊथ क्षेत्रातल्या समस्या पुढे आणून...