September 11, 2024 2:14 PM September 11, 2024 2:14 PM

views 3

आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट

आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देत त्यावर चर्चा केली. पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची कर्ज देयकात तसंच कर्जावरील व्याज दरात सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावतीनं केशव यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मांडला. यावर विचार सुरू असल्याचं अर्थमंत्र...

August 19, 2024 8:24 PM August 19, 2024 8:24 PM

views 15

केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहेत. नवी दिल्ली इथं होत असलेल्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन सरकारच्या कार्यकाळातली सीतारामन यांची बँकांबरोबरची ही पहलीच आढावा बैठक आहे.

August 6, 2024 8:05 PM August 6, 2024 8:05 PM

views 12

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून बँकेनं दंड वसूल केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.  राज्यसभेत आजही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरु राहिली. सरकारनं अनेक कोटी कुटुंबाना एलईडी बल्ब पुरवल्यामुळे ४ हजार ५०० कोटी युनिट विजेची बचत झाल्याचं भाजपाचे खासदार अमर पाल मौर्य यांन...

August 5, 2024 8:32 PM August 5, 2024 8:32 PM

views 22

सहारा समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17 हजार 250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समित्यांच्या नियमानुसार हे पैसे परत करण्यात आहेत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

July 31, 2024 3:41 PM July 31, 2024 3:41 PM

views 11

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी दर लागू होतो. जीवन विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

July 30, 2024 1:28 PM July 30, 2024 1:28 PM

views 13

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. त्यावर गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा  सुरु आहे.

July 24, 2024 8:33 PM July 24, 2024 8:33 PM

views 15

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोप फेटाळले

केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामण यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातल्या चर्चेवेळी सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं. नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं नाही, असं सीतारामण यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र ...