March 27, 2025 9:46 AM March 27, 2025 9:46 AM

views 14

बँकिंगविषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 संसदेत मंजूर

बँकिंगविषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 काल राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभे ने या आधीच हे विधेयक मंजूर केल असून त्यात भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 यासह एकंदर 5 विविध बँकिंग विषयक कायद्यामध्ये सुधारणा आणि संशोधन करण्यात येणार आहे. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी 4 नावं नोंदता यावी अशी तरतूद या विधेयकात आहे. तसच बँकांच्या लेखा परीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं, इत्यादी सुधारणाही त्यात समाविष्ट आहेत.   या विधेयकबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की देशातले...

February 2, 2025 8:13 PM February 2, 2025 8:13 PM

views 12

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमधे सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं, असं त्या म्हणाल्या. करआकारणी सुलभ आणि सोपी असाव...

January 30, 2025 8:34 PM January 30, 2025 8:34 PM

views 17

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात होईल. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. त्यानंतर अर्थसंकल्पावर १३ फेब्रुवारीपर्यंत चर्चा होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र १० मार्चपासून सुरू होईल. या अधिवेशनात १६ विधे...

January 24, 2025 10:25 AM January 24, 2025 10:25 AM

views 15

अर्थसंकल्पा निमित्त केंद्रीय अर्थ मंत्री हलवा सोहळ्याला उपस्थित राहणार

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पा निमित्त हलवा तयार करण्याच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. येत्या एक फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, या अर्थसंकल्पाच्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून हलवा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी तसंच वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

December 31, 2024 1:05 PM December 31, 2024 1:05 PM

views 15

सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा

आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काल नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा करण्यात आली.  वित्त तसंच आर्थिक व्यवहारविषयक विभागाचे सचिव,केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार तसंच आरोग्य आणि शिक्षण विभागांचे सचिवही या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी  काल अगोदर त्यांनी...

December 30, 2024 10:07 AM December 30, 2024 10:07 AM

views 10

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पपूर्व व्यापार आणि उद्योग नेत्यांशी चर्चा करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पपूर्व व्यापार आणि उद्योग नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बैठकीदरम्यान, भारत आता उच्च वाढीला समर्थन देण्यासाठी GDP चा सर्वात मोठा घटक असलेल्या क्रयशक्तिला चालना देण्यासाठी उपाय योजण्याची अपेक्षा आहे.

December 28, 2024 4:09 PM December 28, 2024 4:09 PM

views 11

भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली.  भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सादर करत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आरखडा शिंदे यांनी सीतारामन यांना सादर केला. टपाल विभागाला नवी झळाळी मिळावी, यासाठी काही योजना आखल्या असून हा विभाग अधिकाधिक डिजीटल करण्यावर भर देणार, असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.    देशभरातील टपाल कार्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं, टपाल कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचं नूतनीकरण कर...

December 21, 2024 9:07 AM December 21, 2024 9:07 AM

views 7

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मेघालय आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री; अर्थमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने केंद्रीय अर्थसंकल्पासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी सीताराम...

November 30, 2024 10:21 AM November 30, 2024 10:21 AM

views 9

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि इतर क्षेत्रांमध्ये करून त्यात वैविध्य आणल्याचं दरभंगा इथं झालेल्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प आता महिलाकेंद्री ऐवजी महिलाप्रधान झाला असून येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यास याची देशाला मदत होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य वाढीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ड्रोन दीदी प्रकल्पांचाही त्...

October 19, 2024 2:20 PM October 19, 2024 2:20 PM

views 2

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबंध बहुआयामी आणि दृढ होतील, असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबध बहुआयामी आणि दृढ होतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मेक्सिको इथं होत असलेल्या भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित ‘भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत’ त्या बोलत होत्या. मेक्सिको सिटीचे आर्थिक विकास मंत्री मानोला अलदामा हे देखील या परिषदेत सहभागी झाले होते. भारत देशात औषध निर्मिती, उत्पादन, आणि वाहन क्षेत्रात वाढ होत असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुबलक संधी आहेत, असं अर्थमंत्री ...