July 5, 2024 11:39 AM

views 31

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही माजुली, ढेमजी आणि लखीमपुर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.  

June 23, 2024 7:52 PM

views 19

केंद्र सरकार पूरव्यवस्थापनात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. पुराचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने दूरगामी धोरण तयार करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात असल्याचं शहा यांनी सांगितलं.   इस्रोने दिलेल्या उपग्रह चित्रांचा आणि इतर माहितीचा अचूक वापर आणि बचावाच्या दृष्टीनं उपलब्ध साधनसामु...