December 4, 2025 8:11 PM

views 21

इंडिगो कंपनीची ३०० विमान उड्डाणं रद्द

इंडिगो कंपनीची सुमारे ३०० विमान उ़ड्डाणं आज रद्द झाली आणि इतर अनेक विलंबानं उड्डाण करत होत्या. काल कंपनीची २० टक्क्यांहून कमी विमान वेळेवर उडाली होती. परिस्थिती नियमित करण्यासाठी आणि उड्डाण वेळेत करण्याचं कठीण उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर यांनी कळवलं आहे.