January 29, 2025 10:43 AM January 29, 2025 10:43 AM

views 7

श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध

डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून औपचारिकरित्या निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानंही श्रीलंकेच्या सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे.

January 5, 2025 8:02 PM January 5, 2025 8:02 PM

views 4

सीमा उल्लंघनप्रकरणी भारतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांची सुटका

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशाच्या ताब्यात असलेल्या ९५ भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली, तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या ९० बांगलादेशी मच्छीमारांची सुटका केली. बंगालच्या उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर आज संध्याकाळी ही प्रक्रिया पार पडली. मुक्त झालेले भारतीय मच्छीमार हे काकद्वीप उपविभागाचे रहिवासी आहेत. ते उद्या सागर बेटावर परततील, तिथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांची ते भेट घेतील.

January 5, 2025 1:11 PM January 5, 2025 1:11 PM

views 4

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांगलादेशातल्या  तुरुंगात होते.

December 22, 2024 3:42 PM December 22, 2024 3:42 PM

views 13

मच्छिमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्डचा लाभ

मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य  किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग इमारतीतल्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.