December 29, 2024 7:10 PM December 29, 2024 7:10 PM

views 372

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं पहिलं व्यावसायिक विमान

रायगड जिल्ह्यातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आलं. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानावर पाण्याचे फवारे मारून सलामी देण्यात आली. या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केलं होतं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अन्य एजन्सीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विमानतळावर याआधी लष्कराचं विमान, हवाईदलाच्या सुखोई ३० ही विमाने यशस्वीपणे उतरली होती. नवी मुंबईचं विमानतळ प्रमाणीकरण चाचणीच्या टप्प्यात असून यात विविध तांत्रिक चाचण्...