December 8, 2025 3:27 PM December 8, 2025 3:27 PM

views 20

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगप्रकरणी चार जणांना अटक

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगीमधे २५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे .यात अरपोरा नाईट क्लबच्या जनरल मॅनेजरचा समावेश आहे.   क्लबच्या मालकासह मॅनेजर आणि आयोजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  नाईटक्लबला २०१३ मधे व्यापार परवाना दिल्याप्रकरणी अरपोरा-नाओआ ग्रामपंचायतीच्या सरंपचालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.   दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन वार्ताहर परिषदेत बोलताना दिलं आहे.

November 2, 2025 5:03 PM November 2, 2025 5:03 PM

views 24

मेक्सिकोत झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

मेक्सिकोत सोनोरा मध्ये हर्मोसिलो इथल्या वाल्डोज सुपरमार्केटमध्ये काल झालेल्या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. ट्रान्सफाफॉर्मर चा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्याच्या वृत्ताला सोनोराचे गव्हर्नर अल्फोन्सो दुराझो यांनी दुजोरा दिला आहे.

August 18, 2025 2:54 PM August 18, 2025 2:54 PM

views 26

जालना जिल्ह्यात अपघातात 3 तर अहिल्यानगरमधे दुकानाला आग लागून 5 जणांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.   नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खासगी बसला आग लागली. यातून ३९ प्रवासी प्रवास करत होते. यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.

June 23, 2025 3:41 PM June 23, 2025 3:41 PM

views 10

गोरेगाव फिल्मसिटी कॉम्प्लेक्समध्ये आग

मुंबईत गोरेगाव इथं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल फिल्म सिटी कॉम्प्लेक्समध्ये आज सकाळी आग लागली. अनुपमा स्टुडिओच्या ५ हजार चौरस फूट परिसरात लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कॅमेरे, स्टुडिओ उपकरणं, सजावटीचं साहित्य, पोशाख, प्रकाश व्यवस्था, आदी सामानाचं नुकसान झालं.    अग्निशमन दलानं चार बंब आणि ६ जेटींच्या साहाय्यानं आग आटोक्यात आणली. या आगीत जीवित हानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अग्निशमन दलाचा अंदाज आहे.

March 21, 2025 7:18 PM March 21, 2025 7:18 PM

views 8

नंदुरबार जिल्ह्यात आमला वनक्षेत्रात लागलेल्या आगीत १० ते १२ हेक्टर जंगल नष्ट

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आमला वनक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मधूनच वणवे पेटल्यामुळे आग भडकत आहे. या आगीत आत्तापर्यंत दहा ते बारा हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं वनविभागानं सांगितलं. वनसंपत्तीचं नुकसान झालं असलं तरी अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

March 17, 2025 10:02 AM March 17, 2025 10:02 AM

views 32

उत्तर मॅसेडोनियातल्या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत ५९ जण ठार

उत्तर मॅसेडोनियामध्ये, कोकानी शहरातील एका नाईटक्लबमध्ये काल लागलेल्या आगीत किमान 59 जणांचा मृत्यू झाला आणि 155 हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. युरोपियन देशातील लोकप्रिय हिप-हॉप बँड डीएनकेच्या संगीत कार्यक्रमात सुमारे दिड हजार नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वापरांत आलेल्या फटाक्यांमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं गृहमंत्री पेन्स टोस्कोवस्की यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं.

January 25, 2025 3:26 PM January 25, 2025 3:26 PM

views 64

मुंबईच्या गोरेगाव उपनगरात खडकपाडा इथं फर्निचर मार्केटमध्ये आग

मुंबईच्या गोरेगाव उपनगरात खडकपाडा इथं आज सकाळी फर्निचर मार्केटमध्ये  आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोचले. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत. आग वेगानं पसरल्यानं फर्निचरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आगीत सहा दुकानं जळून पूर्ण खाक झाली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे.

January 22, 2025 1:49 PM January 22, 2025 1:49 PM

views 9

तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर

तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर पोहोचली आहे. काल मध्यरात्री इथल्या स्की रिसॉर्टला आग लागली होती. १२ मजली या हॉटेलमध्ये एकूण २३० प्रवासी वास्तव्याला होते. त्यांच्यापैकी अनेकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले असून शेजारच्या हॉटेलमधल्या प्रवाशांनाही दुसरीकडे हलवण्यात आले आहे. तुर्कीच्या विधी मंत्रालयानं आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सहा जणांची एक समिती स्थापन केली आहे.

October 21, 2024 3:21 PM October 21, 2024 3:21 PM

views 14

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकात आग

पुण्यातल्या महात्मा फुले मंडई परिसरातल्या मेट्रोस्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. मेट्रोस्थानकात तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरु असताना तिथे ठेवलेल्या फोमच्या साहित्याने पेट घेतला असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुणे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

October 16, 2024 3:17 PM October 16, 2024 3:17 PM

views 60

मुंबईच्या ओशिवरा भागात इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू

मुंबईच्या ओशिवरा भागात आज एका इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध दांपत्याचा आणि त्यांच्या मदतनीसाचा समावेश आहे. ओशिवरा इथल्या रिया पॅलेस या इमारतीत दहाव्या मजल्यावर सकाळी साडे आठच्या सुमाराला आग लागली. या आगीच्या धुरामुळे चंद्रप्रकाश सोनी, ममता सोनी आणि त्यांचा मदतनीस पेलू बेटा यांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.