March 1, 2025 11:26 AM

views 48

वर्तमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी दर 6 पूर्णांक 2 टक्क्यांनी वाढला

वर्तमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी दर 6 पुर्णाक 2 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे, मागील तिमाहीत हा दर 5 पुर्णाक 6 टक्के होता.   गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत भारतानं 8 पुर्णाक 6 टक्के जीडीपी वाढ नोंदवली होती. गेल्या हंगामात झालेल्या चांगल्या पावसाळ्यानंतर ग्रामीण भागातील उत्पन्नाचा वापर आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या दरामध्ये वाढ झाली.

August 17, 2024 2:23 PM

views 125

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल...