April 12, 2025 1:12 PM April 12, 2025 1:12 PM

views 8

ऑस्ट्रियाबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत प्रयत्नशील – केंद्रीय अर्थमंत्री

ऑस्ट्रियाबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या बाजूने  भरीव योगदान देण्यासाठी भारत सरकार सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथं भारतीय समुदायाशी संवाद साधत होत्या.   ऑस्ट्रियाच्या विकासात  भारतीय उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये स्टार्ट अप्स, अर्थ तंत्रज्ञान, हरित  तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या उद्योजकांमध्ये उ...

September 12, 2024 1:15 PM September 12, 2024 1:15 PM

views 9

केरळ तिरुअनंतपुरम इथं पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आज बैठक

केरळ राज्यसरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवअनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळ खेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र – राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि १६ व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय्य वाटा मिळवण्याच्या दृष्टीनं मोर्चेबंधणी हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार डॉ अरविंद सुब्रमणियन बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.