October 15, 2024 8:30 PM October 15, 2024 8:30 PM
7
अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
भारतातले उद्योग आणि गुंतवणूक वाढीला चालना देण्यात अमेरिका - भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या मंचाच्या सदस्यांनी अध्यक्ष जॉन टी चेंबर यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या भेटीत सीतारामन यांनी भारताचा वेगवान आर्थिक विकास, युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका, तसंच विमा, गृहनिर्माण, नवीकरणीय उर्जा या क्षेत्रात गुंतवणूकीच्या वाढत्या संधीबाबत माहिती दिली.