February 1, 2025 1:54 PM February 1, 2025 1:54 PM

views 6

गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यमवर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प कर निर्धारण, ...

December 30, 2024 7:00 PM December 30, 2024 7:00 PM

views 4

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि उद्योग प्रतिनीधी तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते.  २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १...

December 10, 2024 10:48 AM December 10, 2024 10:48 AM

views 6

पुढच्या तीन वर्षांमध्ये २ लाख विमा सखी नेमण्याचं सरकारचं नियोजन – अर्थमंत्री

पुढच्या तीन वर्षांमध्ये दोन लाख विमा सखी नेमण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पानिपतमध्ये विमा सखी योजनेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या वर्षी 25 हजार विमा सखी नेमल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये इतकं मानधन दिलं जाईल, असं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेचं...

November 30, 2024 2:39 PM November 30, 2024 2:39 PM

views 4

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मधुबनी जिल्ह्यातल्या क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या स्वयं अर्थसहाय्यता गट, रोजगाराभिमुख योजना आणि अन्य क्षेत्रातल्या लाभार्थ्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिकची ऋण स्वीकृत्री पत्रं वितरित करणार आहेत.

October 24, 2024 1:33 PM October 24, 2024 1:33 PM

views 4

हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून त्यामुळे विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल म्हणाल्या. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी इथे भरलेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या. आर्थिक गर्तेत सापडलेल्या देशांना कर्ज फेडण्यासाठी नव्या आर्थिक ताणाला सामोरं जावं लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचंही सीतारामन यांनी यावेळी अधोरेखित केलं. या दौऱ्यादरम्यान सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने आयोजित एका चर्चासत्...

October 23, 2024 2:21 PM October 23, 2024 2:21 PM

views 9

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना – अर्थमंत्री

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे, असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया विद्यापीठातल्या व्हार्टोन बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या योजनेचा लाभ ६ कोटी तीस लाख रुग्णांना झाला, ही योजना आता ७५ वर्षांवरल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, असं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.   भारतात डिजिटल पायाभूत सुविधांची उपलब्धता असून लोकांना या सुविधा सहज उपलब्ध नसत्या तर भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनू ...

October 22, 2024 3:14 PM October 22, 2024 3:14 PM

views 3

केंद्रीय अर्थमंत्रालयाची ५ राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आणखी पाच राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक तसंच युको बँकेचा समावेश आहे. ज्या बँकामध्ये सीजीएम हे पद अगोदरच अस्तित्वात आहे, तिथे या पदांची संख्या वाढवण्यासही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळं ११ राष्ट्रीयकृत बँकांमधील सीजीएम पदांची एकूण संख्या आता ८० वरून १४४ होणार आहे. ही पदसंख्येची फेररचना बँकांच्या चार सरव्यवस्थापकांमागे एक सीजीएम या गुणोत्त...

October 22, 2024 2:41 PM October 22, 2024 2:41 PM

views 4

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.अमेरिकतल्या कोलंबिया विद्यापीठात त्या बोलत होत्या. भांडवलाच्या उपलब्धतेमुळे भारतीय बँकिंग व्यवस्था बळकट राहिल्याचंही त्या म्हणाल्या.महत्त्वाच्या उद्योगांमधली गुंतवणूक वाढवण्यासाठी आवश्यक भांडवल पुरवठा करणं हाच भारताच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं.सध्या भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून जागतिक विकासात भारत...

October 21, 2024 1:39 PM October 21, 2024 1:39 PM

views 7

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मेक्सिकोचा दौरा संपवून अमेरिकेत दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मेक्सिकोचा दौरा संपवून अमेरिकेत पोहचल्या. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि न्यूयॉर्कमधले भारताचे महावाणिज्यदूत बिनय श्रीकांत प्रधान यांनी त्यांचं काल संध्याकाळी नेवार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं.   अर्थमंत्री १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिकोच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी ग्वाडालजारा आणि मेक्सिको सिटी मधल्या विविध क्षेत्रातल्या नेत्यांशी संवाद साधला. निर्मला सीतारामन २६ ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या द...

October 16, 2024 3:01 PM October 16, 2024 3:01 PM

views 3

निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मेक्सिको दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीतारामन ‘टेक लीडर्स’ गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेच्या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय दिग्गजांसह या जागतिक स्तरावरचे अनेक तज्ज्ञ आणि उद्योजक एकत्र येत आहेत.   सीतारामन मेक्सिकोचे अर्थमंत्री रोगलिओ रामिरेझ दे लाओ यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार असून संसदीय सहकार्य बळकट करण्या...