March 8, 2025 8:43 PM March 8, 2025 8:43 PM
7
बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत-सीतारामन
जागतिक स्तरावर बदल घडत असताना बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगिकारले पाहिजेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होत्या. बँकिंग व्यवसायावर कठोर नियंत्रण असलं तरी स्टेट बँकेनं आपली आघाडी कायम राखण्यात यश मिळवल्याचं त्या म्हणाल्या. सेवेबाबत ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना बँकेनं व्यक्तिगत वितरण व्यवस्थेत परिवर्तन घडवल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.