October 3, 2025 1:13 PM October 3, 2025 1:13 PM
48
विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी GDP वृद्धीचा दर 8 % वाढवण्याची गरज – अर्थमंत्री
विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर आठ टक्के इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.