March 1, 2025 3:33 PM

views 20

कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं अर्थमंत्र्यांच प्रतिपादन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. एकोणपन्नासाव्या नागरी लेखा दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.   सरकारी योजनांचा पैसा देशातल्या ६० कोटी लाभधारकांपर्यंत सार्वजनिक लेखा यंत्रणेमार्फत पोहचवण्यात येत आहे. एक हजार २११ योजनांपैकी अकराशे योजनांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाने लाभार्थ्यांना दिला जातो. या खेरीज सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीव...

October 9, 2024 2:16 PM

views 20

कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही,याची दक्षता बँकांनी बाळगावी – अर्थमंत्री

बँकांनी नफा मिळवण्याच्या हेतूने कर्ज देण्यापूर्वी जोखीम कमी करण्यावर भर द्यावा आणि सावधतेने कर्जवाटप करावं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल मुंबई इथे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या. बँक व्यवस्थेचा एकूण अर्थव्यवस्थेवर आणि कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता बँकांनी बाळगावी अशा सूचनाही सीतारामन यांनी यावेळी केल्या.

September 26, 2024 2:18 PM

views 18

एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्‍यांनी घेतली उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट

एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल समरकंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांची भेट घेतली. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, अणुऊर्जेचा नागरी उपयोग, आरोग्यसेवा आणि फार्मा क्षेत्रातल्या सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान यावेळी चर्चा झाली.