November 6, 2024 10:13 AM November 6, 2024 10:13 AM
3
राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात
राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली. ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२ हजार ६०४, तर ग्रामीण मतदान केंद्र ५७ हजार ५८२ इतकी आहेत. शहरी भागातल्या मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, यासाठी राज...