November 21, 2025 6:42 PM
25
IFFI 2025: ‘फिल्म बाजार’ या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन
पणजी इथे सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू करण्यात आलं आहे. राज्य शासनातर्फे चित्रपटकर्मींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, बाजार विभागात सहभागी झालेले दोन्ही चित्रपट आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विविध उपक्रमांची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.