February 26, 2025 10:56 AM February 26, 2025 10:56 AM

views 14

FIH हॉकी : भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी

एफआयएच हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला. हरमनप्रीतनं धडाडीनं नेतृत्व करत दोन वेळा गोल करून भारताला हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कालच इंग्लंडनं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेत प्रवेश केला होता, मात्र या सामन्यात त्यांना यश मिळू शकलं नाही.

February 23, 2025 1:43 PM February 23, 2025 1:43 PM

views 11

FIH Pro League : भारतीय पुरुष आणि महिला संघाचा प्रतिस्पर्धी संघांवर विजय

भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियम इथं काल रात्री झालेल्या हॉकी एफआयएच प्रो लीगमधल्या सामन्यांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. पुरुष संघानं आयर्लंडचा ४-० नं पराभव केला. तर महिला संघानं आधीच्या सामन्यातल्या पराभवाची परतफेड करत जर्मनीवर  १-० नं   विजय मिळवला.  भारताच्या पुरुष हॉकी संघाचा सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता इंग्लंडविरुद्ध होईल. तर महिला संघाचा सामना नेदरलँडविरुद्ध उद्या संध्याकाळी सव्वा पाच वाजता होईल. 

February 21, 2025 9:51 AM February 21, 2025 9:51 AM

views 16

FIH Pro League :- मध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर

एफ आय एच हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर भुवनेश्वर मधल्या कलिंगा हॉकी मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी सव्वापाच वाजता सुरू होणार आहे.   या स्पर्धेत सलीमा टेटेच्या नेतृत्वातील भारतीय संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.भारतीय पुरुष संघाचा सामना याच मैदानावर आयर्लंडशी होणार आहे.हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ ४ सामन्यांतून ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

February 20, 2025 1:34 PM February 20, 2025 1:34 PM

views 14

साखळी हॉकी स्पर्धा : जर्मनी विराेधातल्या सामन्यात भारताचा विजय

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित साखळी हॉकी सामन्यांमध्ये भारतीय पुरूष संघानं काल रात्री जागतिक विजेत्या जर्मनीवर १-० असा विजय मिळवत मंगळवारच्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या गुरजंत सिंगने सामन्यातील एकमेव गोल केला. भारतीय संघाचा उद्या आर्यलंडशी सामना होणार आहे.