June 13, 2025 2:07 PM June 13, 2025 2:07 PM

views 13

FIH हॉकी प्रो लीगच्या सामन्यात अर्जेन्टिनाकडून भारताचा पराभव

नेदरलँडमध्ये FIH हॉकी प्रो लीगच्या काल झालेल्या सामन्यात अर्जेन्टिनानं भारताचा 1-2 अशा गुणांनी पराभव केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग बोटाच्या जखमेच्या कारणास्तव सामन्यात सहभागी होऊ न शकल्यानं उपकर्णधार हार्दिक सिंगनं या सामन्याचं नेतृत्व केलं. या सामन्यात भारत आता 15 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना उद्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी काल अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिटाची...

June 12, 2025 12:43 PM June 12, 2025 12:43 PM

views 20

हॉकी प्रो लीगमध्ये आज अर्जेंटिनाविरुद्ध भारतीय संघाचा सामना

हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज संध्याकाळी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.    नेदरलँड्समधे अ‍ॅमस्टेलवीन इथंहा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू होईल. काल, अटीतटीच्या सामन्यात, भारताचा अर्जेंटिनाने  ३-४ असा पराभव केला.   आतापर्यंत ११ सामने खेळल्यानंतर भारताच्या खात्यावर १५ गुण जमाझाले असून गुणतालिकेत चौथा क्रमांक आहे.

May 22, 2025 3:10 PM May 22, 2025 3:10 PM

views 17

FIH हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा

एफआयएच हॉकी स्पर्धेच्या युरोप दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा आज करण्यात आली. २४ खेळाडूंच्या या संघाचं नेतृ़त्व हरमनप्रीत करणार आहे. ७ जून ते २२ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. ७ आणि ९ जूनला भारताचा सामना नेदरलँडच्या संघाशी होणार आहे. त्यानंतर १४ आणि १५ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघाची लढत होईल.