September 3, 2024 10:13 AM September 3, 2024 10:13 AM
9
राजस्थानच्या बाडमेरजवळ भारतीय वायुदलाचे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले
राजस्थानच्या बाडमेरजवळ काल रात्री तांत्रिक बिघाडामुळं भारतीय वायुदलाचं मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळलं. मात्र वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुप बचावला असून अन्य कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात आलं. रात्रीच्यावेळी विमान उड्डाणाचा नियमित प्रशिक्षण सराव सुरू असताना विमानात गंभीर स्वरुपाचा तांत्रिक बिघाड झाल्यानं वैमानिकाला आपत्कालीन सुविधेच्या साह्यानं आपली सुटका करून घेणं भाग पडलं. वायु दलानं या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.