May 12, 2025 1:30 PM May 12, 2025 1:30 PM
16
दहशतवादाविरुद्ध लढ्यासाठी प्रधानमंत्र्यांची जगभरातल्या २० राष्ट्रांच्या प्रमुखांशी थेट चर्चा
भारतानं ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा एक निर्णायक संदेश दिला आहे, असं भाजपानं म्हटलं आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानला एकटं पाडून दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या २० राष्ट्रांच्या प्रमुखांशी थेट चर्चा केल्याचं आणि सौदी अरेबिया, अमेरिका आणि अनेक इस्लामिक राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. भारता...