June 11, 2025 1:00 PM

views 22

फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी ब्राझील आणि इक्वाडोर हे संघ पात्र

पुढच्या वर्षी होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी ब्राझील आणि इक्वाडोर हे संघ पात्र ठरले आहेत तर उरुग्वे, पॅराग्वे आणि कोलंबिया हे संघ पात्रता फेरीच्या उंबरठ्यावर आहेत. निओ क्विमिका अरिना इथे झालेल्या सामन्यात ब्राझीलने पॅराग्वेचा १-० असा पराभव केला होता. तर पेरू देशाच्या संघाविरुद्ध खेळताना शून्यावर बरोबरी साधल्यानंतर इक्वाडोरही विश्वचषकासाठी पात्र झाला आहे. 

September 29, 2024 5:10 PM

views 28

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी १५ जूनपासून सुरू होणार

फीफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १५जून २०२५ रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार असून एकूण १२ ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. फीफाचे अध्यक्ष गियान्नी इन्फॅन्टिनो यांनी काल सांगितलं की अमेरिकेत न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडीयमवर १३ जुलै २०२५ रोजी अंतिम सामना होईल. ग्लोबल सिटिझन बरोबर  फीफा गरिबी निर्मूलन कार्यक्रमात भागीदार असेल असंही त्यानी जाहीर केलं.