July 26, 2025 1:50 PM July 26, 2025 1:50 PM

views 11

FIDE Women’s Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत

फिडे महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स, कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू वेंजून हिला आव्हान देईल. भारताच्या बुद्धिबळातल्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा  ठरला आहे.

July 21, 2025 8:19 PM July 21, 2025 8:19 PM

views 7

यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे

यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे.  ही विश्वचषक स्पर्धा ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार असल्याचं फिडे या जागतिक क्रीडा संघटनेनं आज घोषित केलं आहे.  या स्पर्धांचं ठिकाण यथावकाश ठरवण्यात येणार  असल्याचं फिडेनं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेत २०६ बुद्धिबळ पटु सहभागी होणार असून   पहिले  ३ क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना २०२६ मधल्या अटीतटीच्या कॅन्डीडेट टूर्नामेंटसाठी थेट पात्र ठरवलं  जाणार आहे.    

July 19, 2025 1:32 PM July 19, 2025 1:32 PM

views 14

फिडे जागतिक महिला करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय खेळाडूंचा प्रवेश

भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी FIDE जागतिक करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.   त्यामुळं भारत या स्पर्धेच्या अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला पहिला देश बनला आहे. पहिल्या आठमध्ये चार भारतीय खेळाडू असल्यानं, आता भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस आहे.