July 5, 2025 3:13 PM July 5, 2025 3:13 PM
22
बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरूवात
जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. भारताच्या ९ महिला बुद्धिबळपटू यात सहभागी होणार आहेत. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी त्यांच्या फिडे रेटिंगच्या आधारे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी थेट पात्रता मिळवली आहे. तर इतर पाच खेळाडू पहिल्या फेरीपासून सुरुवात करतील.