September 12, 2025 2:36 PM September 12, 2025 2:36 PM

views 16

बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरीन चा विजय

फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगसूदलू वर विजय मिळवत साडेपाच गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एरगेसीला हरवणाऱ्या जीएम मॅथियास ब्लूबॉम शी त्याने बरोबरी केली आहे. दरम्यान विश्वविजेता डी गुकेश ने तुर्कियेचा एडिझ गुरेल याच्याबरोबरचा सामना  गमावला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता त्याला उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश मिळाला असून गुकेशचा पुढचा सामना तिच्याबरोबर होणार आह...

July 11, 2025 10:35 AM July 11, 2025 10:35 AM

views 13

फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत 4 भारतीय खेळाडूंचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

जॉर्जियामध्ये बातुमी इथं फिडे महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चार भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सर्वोच्च मानांकित ग्रँडमास्टर कोनेरु हंपी, द्रोणवल्ली हरिका, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी आपलं आव्हान राखलं आहे.

December 18, 2024 4:01 PM December 18, 2024 4:01 PM

views 6

भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशला युवा रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धांचं विजेतेपद

स्लोव्हेनिया इथं झालेल्या १८ वर्षांखालच्या जागतिक फिडे स्पर्धेत, भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यानं युवा रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. रॅपिड प्रकारात त्यानं साडेनऊ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. या प्रकारात त्याचा रशियाचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर यानं ९ गुणांसह रौप्य, तर युक्रेनच्या रोमन यानं साडेसात गुणांसह कांस्य पदक पटकावलं.   ब्लिट्झ प्रकारात प्रणवनं एक फेरी शिल्लक असताना साडे एकोणीस गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. या प्रकारात त्याचे रशिया...

December 7, 2024 7:46 PM December 7, 2024 7:46 PM

views 12

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडू प्रत्येकी पाच गुणांसह बरोबरीत आहेत. या स्पर्धेत लिरेननं पहिला तर गुकेशनं तिसरा गेम जिंकला. इतर सर्व गेममधे बरोबरी झाली आहे. अजून ४ सामने बाकी आहेत.

September 12, 2024 1:51 PM September 12, 2024 1:51 PM

views 12

FIDE बुद्धीबळ स्पर्धेत मोरोक्को आणि जमैकावर मात करत भारताची दमदार सुुरुवात

४५ व्या FIDE बुद्धीबळ स्पर्धेच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारताने खुल्या गटात मोरोक्कोवर आणि महिलांच्या गटात जमैकावर मात करत दमदार सुुरुवात केली. सुरुवातीच्या सामन्यात डी गुकेश हा पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर आर प्रज्ञनंद यानं सर्वोत्तम खेळ करत मोरोक्कोच्या तिसीर मोहम्मद याला पराभूत केलं. त्यानंतर विदित गुजराथी याने औखीर मेहदी पिएर याला आणि पेंताला हरिकृष्णा याने मोयाद अनास याला हरवलं. तर अर्जुन एरिगसी याने एल्बिया जॅक्स याला नमवत भारताचा ४-० असा विजय निश्चित केला.   महिलांच्या गटात वैशाली हि...