October 18, 2025 5:45 PM October 18, 2025 5:45 PM

views 31

राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियान

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर ४ हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या १ हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आल्याची, तर ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे.

October 12, 2025 5:06 PM October 12, 2025 5:06 PM

views 32

कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे शेतकरी उध्वस्त

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात कृत्रिम फुलांची विक्री वाढल्यामुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच कृत्रिम फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. कृत्रिम फुलांना कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. याबाबतच्या शासन निर्णया...

January 3, 2025 9:57 AM January 3, 2025 9:57 AM

views 7

येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषेदत याबाबत घोषणा केली. या महोत्सवात मराठी चित्रपटांबरोबरच दीडशेहून अधिक देशी-परदेशी चित्रपट प्रेक्षकांना बघता येतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी ही या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 107 देशातल्या 14 चित्रपटांची निवड अंतिम फेरीस...

October 4, 2024 8:55 AM October 4, 2024 8:55 AM

views 10

शारदीय नवरात्रोत्सवाला राज्यात उत्साहात प्रारंभ

आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर कालपासून राज्यात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आता पुढचे नऊ दिवस देवीच्या विविध रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छत्र चामरं ढाळंत, संबळाच्या कडकडाटात, 'आई राजा उदो उदो' च्या गजरात घटाची कल्लोळतीर्थापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. काल...