July 19, 2025 4:00 PM July 19, 2025 4:00 PM
21
महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सामना रंगणार
महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. खेळ साडेतीन वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेत आघाडी घेतली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना २२ जुलै रोजी होणार आहे.