June 19, 2025 3:37 PM June 19, 2025 3:37 PM

views 8

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग चौथ्यांदा व्याजदर ठेवले कायम

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग चौथ्यांदा व्याजदर कायम ठेवले आहेत. सध्या हे दर सव्वा ४ ते साडे ४ टक्क्यांच्या दरम्यान आहेत.  अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चांगला आहे. बेरोजगारीचा दर कमी आहे पण महागाई काहीशी वाढल्याचं फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट कमिटीनं म्हटलंय.

March 20, 2025 1:16 PM March 20, 2025 1:16 PM

views 6

अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने आधारभूत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपला आधारभूत व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने २०२५ या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त, तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर उसळलेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हनं २०२५ या वर्षाचं  दुसरं पतधोरण जाहीर केलं आहे.

December 19, 2024 1:47 PM December 19, 2024 1:47 PM

views 4

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय काल रात्री घेतला आहे. प्रमुख व्याजदर सव्वाचार ते साडेचार टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं फेडरल रिझर्व्हने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकात घट झाली आहे. या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज सुमारे आठशेहून अधिक अंकांची घसरण दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्...