October 18, 2025 5:45 PM October 18, 2025 5:45 PM

views 27

राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियान

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर ४ हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या १ हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आल्याची, तर ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे.