July 20, 2025 3:26 PM July 20, 2025 3:26 PM

views 6

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जगातले सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या पार्थिवावर आज पंजाबमधल्या त्यांच्या गावी बियास इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी यावेळी उपस्थित राहून फौजा सिंग यांना आदरांजली वाहिली. फौजा सिंग यांचं गेल्या मंगळवारी वयाच्या ११४व्या वर्षी बियासमधे अपघाती निधन झालं.

July 15, 2025 12:49 PM July 15, 2025 12:49 PM

views 7

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं अपघातात निधन

पंजाबचे ११४ वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचं जालंधर जिल्ह्यातल्या बियास गावी एका रस्ता दुर्घटनेत निधन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.   ते त्यांच्या फिटनेसमुळे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहिले आहेत. ते खिलाडू वृत्तीचे आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्व होते असंही प्रधानमंत्री म्हणाले. तर फौजा सिंग हे एक आशादायी व्यक्तिमत्व असल्याची भावना पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी व्यक्त केली.