June 17, 2025 3:05 PM June 17, 2025 3:05 PM
14
FATF कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक व्यवहार विषयक कृती गटानं म्हणजेच एफएटीएफनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांच्या आर्थिक मदतीशिवाय असे हल्ले शक्य होत नाहीत असं या कृती गटानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कुठलाही एक देश किंवा संस्था एकट्याने दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करू शकत नाही, तर दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं एफएटीएफच्या अध्यक्ष एलिसा डी एंडा मदराजो यांनी म्हटलं आहे. &nb...