March 13, 2025 3:47 PM March 13, 2025 3:47 PM

views 8

फास्टॅगचा अनिवार्य करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे. पुणे इथे राहणाऱ्या अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झा...

January 7, 2025 8:09 PM January 7, 2025 8:09 PM

views 27

राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्ट-टॅग अनिवार्य

राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.    प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प...

July 19, 2024 3:04 PM July 19, 2024 3:04 PM

views 8

वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल करण्याचे निर्देश

देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसेल, तर दंड म्हणून दुप्पट टोल वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोल नाक्यांना दिले आहेत.   अनेक वाहनं दर्शनी भागात काचेवर फास्ट टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल वसुलीत वेळ जातो, वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानं एक हजार टोल नाक्यांना कठोर कारवाईच्या सूचना जारी केल्या आहेत. देशातल्या ४५ हजार किलोमीटर लांबीच्या...