June 28, 2024 5:48 PM June 28, 2024 5:48 PM
22
शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. साडे 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. गाव तेथे गोदाम योजनेची घोषणा सरकारनं केली असून यात पहिल्या ट...