January 3, 2025 7:31 PM January 3, 2025 7:31 PM

views 14

शेतीच्या नुकसानाचे उपग्रहाव्दारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात आयोजीत किसान संवाद मेळाव्यात बोलत होते.   शेतकरी अन्य राज्यात शेतमाल विकणार असेल, तर त्यासाठी वाहतूकीचा खर्च येईल तो खर्च केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी पन्ना...

January 1, 2025 8:39 PM January 1, 2025 8:39 PM

views 14

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांसंदर्भात त्यांनी  सांगितलं, की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान  आहे. 

January 1, 2025 10:01 AM January 1, 2025 10:01 AM

views 6

ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे साखर आयुक्तांचे निर्देश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची; मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुण्यातील साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं.   ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक विश्वास देशमुख यांनी क...

December 7, 2024 11:15 AM December 7, 2024 11:15 AM

views 24

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल – केंद्रीय कृषी मंत्री

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चौहान बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचं सांगून, अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत, 2013-14 च्या तुलनेत आता 1 लाख 22 हजार 528 कोटी रुपयांची अभूतपूर्व वाढ केल्याचं त्यांनी नमूद केलं.

October 20, 2024 10:35 AM October 20, 2024 10:35 AM

views 13

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

October 15, 2024 8:44 PM October 15, 2024 8:44 PM

views 10

शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान आणि भरडधान्य विक्री करावी लागू नये म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत कुणी खरेदी करत असेल तर हा कक्ष त्यावर नियंत्रण ठेवेल. त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आणि किमान आधारभूत किमतीत धान्य खरेदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहील, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी या भरडधान्यांच्या खरेदीची ...

September 22, 2024 6:35 PM September 22, 2024 6:35 PM

views 7

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेल – पालकमंत्री विखे पाटील

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

September 2, 2024 8:58 PM September 2, 2024 8:58 PM

views 12

कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ४,१९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर

२०२३ मधल्या खरीप हंगामादरम्यान कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकरता  राज्य शासनानं सुमारे ४ हजार १९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केलं आहे. हे अर्थसाह्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असून या वर्गवारीची सुरुवात १० सप्टेंबरपासून केली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

July 5, 2024 8:03 PM July 5, 2024 8:03 PM

views 14

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचं अनुदान देण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हे दर येत्या १ जुलै पासून लागू आहेत. याच बैठकीत दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान देण्यावरही शिक्कमोर्तब झालं. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल असंही मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.

July 3, 2024 3:46 PM July 3, 2024 3:46 PM

views 15

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं होईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येत्या शुक्रवारी आपल्या दालनात बैठक बोलावली आहे. आमदार आशीष शेलार यांनी आज विधानसभेत...