March 20, 2025 9:42 AM March 20, 2025 9:42 AM

views 14

लातूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचं आवाहन

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शासनाकडून मिळणारी मदत प्राप्त करून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतक-यांनी ई-केवायसी प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेपर्यंत करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्यानं २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरीत करणं बाकी असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.

March 18, 2025 2:44 PM March 18, 2025 2:44 PM

views 20

केंद्र सरकार शेतकऱ्यांशी दुजाभाव करत नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण

कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार दुजाभाव करत नाही, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. देशातील शेतकऱ्यांच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारानं कायमच प्राधान्य दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं.    काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी वायनाडशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान यांनी सांगितलं की, देशाच्या कोणत्याही राज्यावर मग ते केरळ असो वा कर्नाटक तिथं जर ...

March 15, 2025 4:01 PM March 15, 2025 4:01 PM

views 28

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं – ज्येष्ठ नेते शरद पवार

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोरण आखायला हवं असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. २०२४ मधे राज्यात २ हजार ६३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना हे आवाहन केलं. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार म्हणाले.

February 25, 2025 10:53 AM February 25, 2025 10:53 AM

views 10

राज्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्याचं पणनमंत्र्यांचं आश्वासन

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्याचं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिलं. पुण्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. राज्यात काही आदिवासी भागात आणि 69 तालुक्यांमध्ये नव्यानं बाजार समिती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता ठेवून आणि ...

February 23, 2025 1:40 PM February 23, 2025 1:40 PM

views 9

चंदीगढ : कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा

चंदीगढ इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली, शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या, असं केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं. चर्चेची पुढची फेरी १९ मार्चला होणार आहे.

February 20, 2025 7:48 PM February 20, 2025 7:48 PM

views 27

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापुरात आज १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकत्र बैठक झाली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी १२ मार्चला विधानसभा अधिवेशनादरम्यान विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकांपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची महायुतीच्या नेत्यांची भाषा निवडणुकीनंतर बदलल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.

February 16, 2025 8:25 AM February 16, 2025 8:25 AM

views 17

पुण्यात शेतकऱ्यांना ओळखपत्राचं वाटप

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ओळख क्रमांक जुन्नर तालुक्यात दिले आहेत. पुणे शहरात शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं केवळ २१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले . शेतकऱ्यांकडे जमीन, कर्ज, मिळणार्या योजनांचा लाभ आदी माहिती असणारं एक ओळखपत्र ऍकग्रिस्टेकच्या माध्यमातून दिलं जातं. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढे ओळख क्रमांक गरजेचा आहे. त्यामुळे शेतकर्यांदनी नोंदणी करून लवकरात लवकर ओळख क्रमांक घ्यावा असं आवाहन उपजिल्हाध...

January 27, 2025 1:14 PM January 27, 2025 1:14 PM

views 12

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘शेतातून थेट ग्राहकांपर्यंत’ या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीशिवाय आपला माल विकून उत्पन्न वाढवता येत आहे, असंही ते म्हणाले.  

January 22, 2025 7:30 PM January 22, 2025 7:30 PM

views 15

संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात, तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.

January 10, 2025 9:07 AM January 10, 2025 9:07 AM

views 13

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ५३५ कोटींहून अधिकची मदत

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, ब...