May 19, 2025 8:18 PM May 19, 2025 8:18 PM

views 53

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची बँकांना ताकीद

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करा, अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बँकांना दिली आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६७ व्या बैठकीत बोलत होते.  यावेळी राज्याचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला.    शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका, हे वारंवार सांगितलं, तरी बँका सिबिल मागता...

May 19, 2025 8:18 PM May 19, 2025 8:18 PM

views 15

खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळणार !

यंदा चांगला पावसाळा होईल असा अंदाज आहे, त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कोकाटे यांनी दिला.    नाशिक जिल्ह्यात यंदा ६ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीसाठी प्रस्तावित आहे. त्या संदर्भात कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी योजनांच्या मा...

May 15, 2025 7:31 PM May 15, 2025 7:31 PM

views 13

बाजारांचा विकास करताना शेतकऱ्यांचं हित, अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय नामांकित बाजाराच्या अनुषंगानं राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित, तसंच बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यासंदर्भात विविध प्रश्नांवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुनच याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पवार यांनी दिले.    कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाबाबतही आज अजीत पवार यांच...

May 14, 2025 7:40 PM May 14, 2025 7:40 PM

views 16

शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभाग

राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी अर्थात Di-Ammonium Phosphate खताची शेक-यांकडून जास्त मागणी आहे.चालू खरिप हंगामामध्ये शेतक-यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचं  आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना करण्यात आलं आहे.

April 30, 2025 7:28 PM April 30, 2025 7:28 PM

views 19

पीक वीमा योजनेत केलेला बदल चुकीचा असल्याची काँग्रेसची टीका

राज्य सरकारनं पीक वीमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं बातमीदारांशी बोलत होते.  हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणून तो रद्द करावा, आणि आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा लागू करावी, अन्यथा शेतकरी, आणि काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.    नैसर्गिक आपत्ती हंगामातली प्रतिकूल परिस्थिती, आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत हो...

April 15, 2025 7:35 PM April 15, 2025 7:35 PM

views 10

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या FRPबाबतचा निर्णय रद्द

राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीबाबत राज्यशासनानं २१ फेब्रुवारी २०२२ ला जारी केलेला शासननिर्णय रद्द केला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. ऊसाच्या एफआरपीसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं २७ मार्च २०२५ ला दिलेल्या आदेशामुळे २१ फेब्रुवारी २०२२ चा शासननिर्णय  रद्द केला आहे. सध्या ऊसउत्पादक शेतकऱ्य़ांना एफआरपी देण्याबाबत त्या शासननिर्णयापूर्वीची कार्यवाही अंवलंबावी, असं आजच्या शासननिर्णया...

April 2, 2025 7:55 PM April 2, 2025 7:55 PM

views 12

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी

पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत असेल तर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या आश्वासनाचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडल्याचं ते म्हणाले. 

March 28, 2025 9:12 PM March 28, 2025 9:12 PM

views 14

शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा नुकसान भरपाई

राज्यातल्या ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीकविमा नुकसानभरपाई जमा होणार असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे. शासनानं विमा कंपन्यांना द्यायचा २ हजार ८५२ कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करायला मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खात्यात पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असं ते म्हणाले. 

March 28, 2025 8:45 PM March 28, 2025 8:45 PM

views 21

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच मिळणार

'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून ९३ लाख २६ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. सहाव्या हप्त्यात सुमारे २ हजार १६९ कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाने कळवलं आहे. 

March 23, 2025 3:20 PM March 23, 2025 3:20 PM

views 10

अकोला : शेतीच्या वस्तूंवरचा GST कर रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची  औजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा, किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीसंबंधी वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो, त्यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास १५ हजारांची वाढ झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.