October 7, 2025 5:53 PM October 7, 2025 5:53 PM

views 39

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, रोहित पवारांची टीका

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. आपत्तीग्रस्तांना देण्याच्या मदतीचा निधी केंद्रसरकारच्या योजनांमधून देण्यात आलं तर त्याला विलंब होऊ शकतो. तसंच आत्ता राज्यशासनाने जाहीर केलेलं अर्थसहाय्य शासनाच्याच तत्सम योजनांच्या तुलनेत अपुरं असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.    निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं राज्यसरकार पाळत नसून शेतकऱ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार असल्याचा...

October 5, 2025 7:07 PM October 5, 2025 7:07 PM

views 42

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन

राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.   केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ३ हजार १३२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्यापैकी १ हजार ६३१ कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण एप्रिल महिन्यात झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. कर्ज वसुलीला तात्पु...

September 24, 2025 1:24 PM September 24, 2025 1:24 PM

views 49

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत,    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. दुपारी ते लातूर आणि धाराशी...

September 23, 2025 8:10 PM September 23, 2025 8:10 PM

views 106

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २,२१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून १ हजार ८२९ कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर  ते वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मदत जाहीर करण्याची प्रक्रिया निरंतरपणे चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे जीआर वितरीत केले जातील, असही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.    अहिल्यानगर, सोलापूर, ...

September 23, 2025 2:55 PM September 23, 2025 2:55 PM

views 45

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल अशी कृषीमंत्र्यांची ग्वाही

अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केला. जिथे अद्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा  आणखी नुकसानी झालेली असण्याची शक्यता आहे तिथे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं.    राज्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. तसंच पशुधन वाहून घेलं असून घरांचही नुकसान झालं असल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्य...

September 21, 2025 7:28 PM September 21, 2025 7:28 PM

views 21

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर

नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेने तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवल्यामुळे ही मदत त्वरित मंजूर केल्याचं जाधव पाटील म्हणाले.    या मदतीचं वाटप करताना शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मदतनिधीचा वापर करू नय...

September 21, 2025 6:28 PM September 21, 2025 6:28 PM

views 27

SevaParv: शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकारची धोरणं

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली. याविषयी सविस्तर जाणून घेऊया….   सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांसाठी निश्चित उत्पन्नाचे स्रोत खुले झाले. त्यांच्या जगण्यातील अस्थिरता संपली. २०१३-१४ ला शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील वाटा २७ हजार कोटी रुपये होता. तो वाढून १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतका झाला. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. किसान क...

September 18, 2025 4:02 PM September 18, 2025 4:02 PM

views 32

Seva Pakhwada: कृषी क्षेत्रात सुधारणा, उत्पन्नातही वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषी क्षेत्राचं क्षितिज आणखी विस्तारत आहे. शेतीपूरक विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत असून त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी हे कृषी आधारित उद्योग...

June 17, 2025 1:07 PM June 17, 2025 1:07 PM

views 22

शेतमालाची विक्री करण्यासाठी शॉपिंग मॉल उभारणार

महाराष्ट्राच्या विविध भागात सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून, या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेत मालाची थेट खरेदी करता येईल. महाराष्ट्राचे  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली.    हे मॉल्स सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील, आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची ३५ हजार  एकर जमीन उपलब्ध केली जाईल, असं ते म्हणाले. योजनेनुसार मॉलचा ५० टक्के भाग खासगी व्यावसायिकांच्या वापरासाठी  दिला जाईल. यासाठी ३० ते ४० वर्षांचा करार केला जाईल. उरलेला ५० टक्के भाग केवळ शेतकरी सं...

June 3, 2025 10:29 AM June 3, 2025 10:29 AM

views 15

उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ

देशभरात उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. साधारणपणे 84 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.१५ लाख हेक्टरने अधिक आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भाताच्या लगावडीच्या क्षेत्रात जवळपास पाच लाख हेक्टरची वाढ झाल्याचे तसंच हरभरा डाळ, उडीद, श्रीधान्य, तेलबिया तसंच मका आणि भुईमूग यांच्या पेरणी क्षेत्रातही लक्षणीय वृद्धी झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे.