December 3, 2025 2:48 PM December 3, 2025 2:48 PM

views 27

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.    अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषीबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प...

November 27, 2025 6:44 PM November 27, 2025 6:44 PM

views 44

शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती!

महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात रुपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहकार विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.   राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात ३२ हजार कोटींचा विशेष मदतनिधी जाहीर केला होता; त्याचवेळी ...

November 4, 2025 3:01 PM November 4, 2025 3:01 PM

views 82

बुलढाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनानं सुमारे ३०० कोटी पेक्षा जास्त मदत निधी जमा केल्याची माहिती जिल्ह्यधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय,  २०२४-२५ मधल्या रखडलेल्या पीक विम्याचे सुमारे १२१ कोटी रुपये ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले  आहेत, असंही त्यांनी सांगितलं.     ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत किंवा ज्यांनी  शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही अशांना ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन काम करत ...

November 3, 2025 4:00 PM November 3, 2025 4:00 PM

views 30

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नुकसानीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचंही...

October 29, 2025 3:23 PM October 29, 2025 3:23 PM

views 63

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची भूमिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी इतके विविध प्रश्न मांडलेले आहेत, की फक्त आंदोलनाच्या माध्यमातून ते सोडवता येणार नाहीत, त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करावा लागेल, त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. आंदोलनात झालेल्या गर्दीमुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे त्यांनी असे प्रकार टाळावेत, रेल रोकोसारखी आंदोलनं करू नये, चर्चेसाठी  यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ...

October 28, 2025 7:02 PM October 28, 2025 7:02 PM

views 76

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी ११ हजार कोटी रुपये पुढच्या १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.   राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करायला आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून,  ही मदत पुढच्या १५ दिवसांत ...

October 24, 2025 7:41 PM October 24, 2025 7:41 PM

views 45

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकण्याचं आवाहन

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून खरेदी केंद्राचं जाळं निर्माण केलं आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

October 15, 2025 6:34 PM October 15, 2025 6:34 PM

views 60

शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांच्या सेंद्रीय उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. ते आज मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.    शेतकऱ्यांच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्या तरी राज्यातल्या सेंद्रीय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन त्यांच्या सेंद्रीय ...

October 12, 2025 6:10 PM October 12, 2025 6:10 PM

views 26

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली किंमत, उत्पादकताही वाढली – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशातले ५२ लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अकराशेपेक्षा जास्त कृषी उत्पादन संघटनांशी जोडलेले असून याद्वारे त्यांच्या पिकाला चांगली किंमत मिळत असून उत्पादकताही वाढली आहे, असं कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या सर्व संघटनांची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

October 7, 2025 7:28 PM October 7, 2025 7:28 PM

views 38

सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच  कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.    अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ६ हजार ५०० कोटी रुपये इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत, त्यांचा समावेश पॅकेजमधे करून सरकारने चलाखी केल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे.