October 19, 2025 10:09 AM

views 128

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

September 20, 2025 11:30 AM

views 60

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फायदा मध्यस्थांच्या खिशात न जाता थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि याचा प्रभाव येत्या 22 तारखेपासूनच दिसायला हवा असं चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं

July 2, 2025 3:18 PM

views 25

शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव

राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग, ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सोयाबीन खरेदीसाठी २ केंद्रं निश्चित केली असून तिथं सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची खरेदी झाल्याची माहिती त्यांनी आज विधासभेत दिली. सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या व...

June 27, 2025 3:52 PM

views 64

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस, हळद आणि मका पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना म्हटल...