November 13, 2025 5:52 PM November 13, 2025 5:52 PM

views 11

चुकीचे मानांकन प्रसिद्ध केल्याबद्दल अल फलाह विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस

आपल्या संकेतस्थळावर चुकीचे मानांकन प्रसिद्ध केल्याबद्दल नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेनं  फरीदाबाद इथल्या अल फलाह विद्यापीठाला कारणे दाखवला नोटीस बजावली आहे. अल फलाह विद्यापीठ मूल्यांकन आणि मानांकन करण्यासाठी मान्यताप्राप्त नाही असं नॅकने म्हटलं आहे. विद्यापीठाने संकेतस्थळ किंवा इतर कुठल्याही कागदपत्रावरून नॅक मानांकन काढून टाकावं असे निर्देश नॅकने दिले आहेत. दिल्ली स्फोट प्रकरणात अल फलाह विद्यापीठाचं नाव गुंतल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष दिलं जात आहे.

July 17, 2024 1:06 PM July 17, 2024 1:06 PM

views 10

फरीदाबाद येथे प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

फरिदाबाद इथल्या ट्रान्स्लेशनल आरोग्यविज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल, आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरील 9 वी प्रयोगशाळा असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.   सिंग यांच्या हस्ते जेनेटिकली डिफाईंड ह्युमन असोसिएटेड मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या सुविधेचे उद्धाटन झाले. ही सुविधा संशोधन आणि विकास यासाठी संशोधन...