March 12, 2025 7:21 PM March 12, 2025 7:21 PM

views 17

भेसळीचं पनीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार- अजित पवार

कृत्रिम किंवा भेसळीचं पनीर आरोग्यासाठी धोक्याचं असून त्याच्या विक्रेता आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं.   अशा प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी नवीन प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी तसंच प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यासाठी भरीव निधी देऊ, संबंधित नियमांमधे बदल करण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करु , असं आश्वासन पवार यांनी दिलं.